अक्षराय

कथा ” – आमचा इतिहास

अक्षरायचा प्रवास १९९० मध्ये दोन शिक्षकांपासून सुरू झाला. कार्यशाळा आणि शिबिरे यांपासून सुरुवात झालेली अक्षराय आज अनेकांकरता प्रेरणास्थान आहेच, मात्र एक यशस्वी संस्था म्हणूनही नावारुपाला आलेली आहे. संस्थापकांनी निष्काम भावनेने, प्रेमाने, आणि सातत्याने केलेले मार्गदर्शनामुळे अक्षराय आज एक आदराचे स्थान आणि संस्थेच्या सभासदांकरता एक मार्गदर्शनाचा स्त्रोत बनली आहे.

इच्छा ” – आमचे बोधवाक्य

भारतीय भाषेतील लिप्यांचा इतिहास पाच हजार वर्षांपर्यंत मागे जातो. भाषासंशोधकांनी भारतातील दहा विविध लिप्या नमूद केलेल्या आहेत, ज्यांपासून तब्बल बावीस बोली आणि लेखी भाषांचा उगम झालेला आढळतो. अक्षरायच्या माध्यमातून आम्ही या भाषा आणि लिप्यांच्या संवर्धनाकरता तीनकलमी कार्यक्रम राबवतो.

* प्रसार: ‘अक्षराचा वापर एक माध्यम म्हणून विविध रुपांमध्ये करणे..

* प्रशिक्षण: कार्यशाळा आणि शिबीरांच्या आयोजनांतून सामान्यजनांमध्येविशेषत: विद्यार्थी आणि विविध कलाव्यावसायिकभारतीय भाषा आणि लिपींविषयी जागरुकता निर्माण करणे आणि त्या शिकण्याची संधी उपलब्ध करुन देणे..

* प्रज्ञाशोध: भारतीय लिपी, सुलेखन आणि मुद्राक्षरकला यांतील संशोधन आणि विकासाकरता सुविधा उपलब्ध करुन देऊन प्रोत्साहन देणे..

कर्म ” – आमचे कार्य

भारतीय भाषांच्या सर्व लिपी एका सामायिक ध्वनिआधारित प्रणालीनुसार आहेत. सहाजिकच, या लिपींमध्ये आपल्याला अजूनही अनभिज्ञ असलेल्या अनेक खुब्या दडलेल्या असतील या गृहितकाला वाव आहे. या लिप्यांमधील परस्परसंबंध, त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि त्यांच्यातील देवाणघेवाणीविषयी नियोजनबद्ध संशोधन होण्याची नितांत आवश्यकता आहे. अश्या संशोधनाकरता कटिबद्ध असणारी संस्था म्हणजे अक्षराय! या संस्थेच्या माध्यमातून लिपी, लिपीवैशिष्ट्ये, आणि तदानुषंगिक विषयांवरजसे की लिपीशास्त्र, सुलेखन, मुद्राक्षररचना, मुद्राक्षररकला, आणि साहित्य यांविषयी अधिक संशोधन करण्याचा प्रयत्न आहे. अफाट विस्तार असलेल्या अभ्यासक्षेत्रात काम करायचे असल्याने, असीम ध्येय उराशी बाळगलेल्या अक्षरायचे कार्यधोरण मात्र सहज सोपे आहेसुयोग्य संसाधनांची निवड करुन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणे!